Subscribe Us

*🚨बदली पोर्टल महत्वाचे🚨*2025

 


*🚨बदली पोर्टल महत्वाचे🚨*

*सर्वांना कळविण्यात येते की, बदली पोर्टलवर संवर्ग - 1 व संवर्ग 2 मध्ये लाभ घेऊ इच्छिणाऱ्या शिक्षकांची नोंद करण्याकरिता सुविधा सुरू झालेली आहे.*

*💥संवर्ग - 1💥*

सर्वप्रथम 

*⏹️अवघड क्षेत्रातील रिक्त पदे भरण्यासाठी , अवघड क्षेत्र राऊंड चालवला जाइल* 

*📌या समोरील ✅ करावा.*


*यानंतर 💥तुम्हाला बदलीतून सूट हवी आहे काय ?💥* या प्रश्नाचे उत्तर होय किंवा नाही मध्ये द्यावे लागेल.


*➡️बदलीतून  सुट  हवी असल्यास होय निवडावे नको असल्यास नाही निवडा* 


यानंतर *💥विशेष संवर्ग भाग 1 चा प्रकार निवडायचा आहे💥*

*➡️Self किंवा Spouse* *स्वतः चे आधारे लाभ घेत असल्यास self निवडावे तसेच पती किंवा पत्नीच्या आधारावर लाभ घेत असल्यास spouse निवडावे*


यानंतर *💥संवर्ग भाग -1 चा उपप्रकार निवडावा💥*

*➡️स्वतःच्या आधारे असेल तर एक ते 14 पैकी जो लागू असेल तो पर्याय निवडावा*


*➡️जोडीदाराच्या आधारे लाभ घेत असाल, तर 15 ते 20 या क्रमांकापैकी लागू असलेला क्रमांक क्रमांक निवडावा*


*व OTP टाकून Submit करावे*


*💥संवर्ग -2💥*


सर्वप्रथम 


*⏹️जिल्हांतर्गत बदली अर्जशासन निर्णय मुद्दा क्रमांक 4.3.5 मध्ये नमूद केल्याप्रमाणे विशेष संवर्ग भाग-२ चा लाभ घेण्यासाठी, शिक्षकांनी सक्षम अधिकाऱ्यांकडून प्रमाणित केलेला ३० किमी चा दाखला उपलब्ध करून तो सादर करणे अनिवार्य आहे. मी ही प्रमाणपत्रे सादर करण्यास असमर्थ ठरलो तर माझा अर्ज रद्द करण्याचा अधिकार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आहे हे मी मान्य करतो.*


*यासमोरील check box  ✅ करावे*


*📌सध्याचे तुमचे व तुमच्या जोडीदाराच्या शाळांमधील अंतर 30 किलोमीटर पेक्षा जास्त असायला हवे.*

सूचना दिसेल


*➡️यानंतर संवर्ग भाग दोन मधील प्राधान्य क्रमांक निवडा*

असे दिसेल 

*📌यामध्ये खालील ड्रॉप डाऊन मेनू मधील अनुक्रमांक 1 ते 7 मधील जे लागू असेल ते निवडावे*

*व OTP टाकून Submit करावे*


*💥टीप- आपण निवडलेले पर्याय ओटीपी टाकून सबमिट केल्याशिवाय ते ग्राह्य धरल्या जाणार नाही. आपण भरलेले पर्याय सबमिट झाल्याची खात्री करावी अनावधानाने विड्रॉल करू नये.याची गांभीर्याने नोंद घ्यावी.*


*💥सद्यस्थितीत बदली पोर्टलला आपल्याला शाळा निवडायच्या नाहीत केवळ आपण संवर्ग एक किंवा दोन चा लाभ घेऊ इच्छिता का व त्याचे उपप्रकार एवढीच माहिती नोंदवायची आहे.*

*सद्यस्थितीत सदर सुविधा ही दिनांक 8 जून 2025 ला मध्यरात्री बारा वाजेपर्यंत सुरू राहील. त्यामुळे वेळेपूर्वी आपली माहिती नोंद करून घ्यावी.*

माहितीस्तव 


Post a Comment

0 Comments