Subscribe Us

इयत्ता 5 वी नवोदय प्रवेश परीक्षा | उतारा-50 | Navoday Pariksha | Utara-50

 

उतारा 50 

भारतीय डॉल्फिन हा आता एक नष्टप्राय जीव आहे. एके काळी ते गंगा, ब्रह्मपुत्रा आणि महानदी या नद्यांमध्ये विपुलतेने सापडायचे. आता त्यांची संख्या खूपच कमी झालेली आहे. आता असे सांगतात की, गंगा आणि ब्रह्मपुत्रा या नद्यांमध्ये ते जवळजवळ ५००० च्या संख्येने आढळतात. जगात इतरत्र आढळणाऱ्या समुद्री अथवा नदीतल्या डॉल्फिनपेक्षा हे निराळे आहेत. हे आंधळे भासतात; पण निसर्गाने एका उल्लेखनीय रितीने त्यांच्या हया कमतरतेची भरपाई केलेली आहे.त्यांची श्रवणशक्ती अत्यंत विकसित व उच्च दर्जाची असते आणि अशा त-हेने ते ध्वनीच्या साहाय्याने विचरण करण्यास सक्षम बनतात. त्यांच्या कवटीचा वरचा भाग विलक्षण प्रकारे कपाच्या आकाराचा असतो आणि तो त्यांना प्रतिध्वनीच्या माध्यमातून स्थाननिश्चिती करणारे ध्वनी निर्माण करण्यास मदत करतो. तोच या सस्तन प्राण्याला सूक्ष्म पदार्थ ओळखण्यास आणि त्यांच्यामध्ये फरक करण्यास सक्षम बनवतो. उदाहरणार्थ, डॉल्फिन जिवंत मासा व मेलेला मासा आणि अगदी मृत मासा व नकली मासा यांच्यातील फरक सांगू शकतो.

Post a Comment

0 Comments