उतारा - 49
सिमी म्हणजे एक पिल्लू होते. ती फार गोड होती. आशाला ती एका पार्कमध्ये रडत असलेली सापडली होती. जेव्हा तिने उचलून घेतले, तेव्हा पिल्लू रडायचे थांबले आणि तिच्याकडे पाहू लागले. आशाला तिचे असे बघणे आवडले आणि तिने तिला घरी घेऊन जायचे ठरवले. तिच्या आईनेही या बेताला संमती दिली. त्या दोघींनी तिचे नाव ठेवले 'सिमी' आणि तिला त्या आनंदाने घरी घेऊन आल्या.अजून त्या पिल्लाला कोणी शिकवलेले नव्हते, म्हणून आशाने विचार केला की त्याला शिकवावे. दुसऱ्या दिवशी सकाळी ती सिमीला बाहेर घेऊन गेली आणि तिला काही गोष्टी शिकवल्या.शिकवणाऱ्याला थोडे कठोर व्हावेच लागते. त्यामुळे जेव्हा तिने ऐकले नाही, तेव्हा आशाने तिला शिक्षा केली आणि जेव्हा तिने मनाप्रमाणे करून दाखवले, तेव्हा तिला बक्षीस दिले.एकंदरीत शिकवणे काही अवघड नव्हते. एका आठवड्याच्या आत सिमी म्हणजे एक चांगले सभ्य पिल्लू बनून गेली.
0 Comments