उतारा - 47
महात्मा गांधीजींचे आयुष्य म्हणजे 'सत्याची प्रयोगशाळा,' तशीच 'आहाराची 'ही. पूर्ण सात्त्विक आहार शोधून काढण्यासाठी त्यांनी नाना प्रयोग केले. मांसाहार तर त्यांनी प्रयत्नपूर्वक अव्हेरला होता. त्यापायी इंग्लंडमध्ये असताना कडकडीत उपवास काढले होते. स्नेहह्यांची कुचेष्टाही सोसली. पुढे त्यांनी मसाल्याचा वापर वर्ज्य केला. स्वादाचे खरे स्थान जीभ नव्हे, तर मन आहे,' हा त्यांचा आहारविषयक प्रयोगांचा मूळ सिद्धांत होता. ते दिवसातून तीनदा जेवत असत. पण त्यांचे डोके दुखत असे. एकदा त्यांच्या मनाने घेतले की, 'मी जर सकाळचे खाणे सोडून देईन; तर डोकेदुखीतून मुक्त होईन.' सकाळचे खाणे बंद करणे त्यांना अवघड वाटले, तरी त्यांनी ते अमलात आणले व त्यांची डोकेदुखी कायमची थांबली. यावरून आपला आहार जरुरीपेक्षा अधिक होता; असे त्यांनी अनुमान काढले.
0 Comments