उत्तारा 46
व्हेनिस हे इटलीच्या उत्तरेकडील एक विलक्षण आणि सुंदर शहर आहे. ते एका बेटाने बनलेले नाही; तर एकशे सतरा बेटांनी बनलेले आहे. व्हेनिसच्या बेटांना परस्परांशी जोडणारे जवळजवळ चारशे जुने दगडी पूल आहेत, परंतु या शहरात मोटारगाड्या नाहीत की बस नाहीत. हे असे आहे कारण व्हेनिसला रस्ते नाहीत. प्रत्येक जण एका ठिकाणाहून दुसरीकडे नावेने जातो. नावा एकशे पन्नास कालव्यांमधून अथवा जलमागाँतून विहार करतात.इमारतींच्या भिंतींना आणि पायऱ्यांना पाणी स्पर्श करते. व्हेनिसचे लोक उत्तम नावाडी आहेत. त्यांच्याकडे सपाटतळाच्या लांब नावा असतात, त्यांना 'गोंडोला' म्हणतात.परंतु आज तुम्हांला व्हेनिसमध्ये कितीतरी मोटारबोटीही पाहायला मिळतात.
0 Comments