उतारा - 45
जगातील उष्ण प्रदेशात जेथे वर्षभर पाऊस पडतो, तेथील जंगलांत विविध झाडांची उत्तम रितीने वाढ होते. त्या जंगली प्रदेशात एवढा पाऊस पडतो की, त्यांना 'पावसाळी जंगले' म्हणतात.पावसाळी जंगलातील वृक्ष नेहमी हिरवेगार असतात. ते मोठ्या संख्येने वाढतात व त्यांची उंचीही इतकी असते की. सूर्यप्रकाश अडल्याने सूर्याची किरणे जमिनीपर्यंत पोहोचतच नाहीत. परिणामी तेथे मोठ्या प्रमाणावर लहान झुडपे उगवतात. विविध जातींची ही झुडपे व वेली उंच वृक्षांच्या फांदयांवर उगवतात. त्यामुळे त्यांना सूर्यप्रकाश मिळू शकतो. अनेक जातींचे पशू व पक्षीही त्या पावसाळी जंगलात राहतात.
0 Comments