उतारा - 44
जगातील लक्षावधी लोक आंधळे आहेत. पूर्वी लोकांना वाटत असे की, आंधळ्यांसाठी काहीही करता येणे शक्य नाही आणि त्यांचा काही उपयोग नाही. इतकेच नव्हे, तर लोक असेही समजत असत की, आंधळे म्हणजे कुटुंबाला भार आहेत आणि भीक मागणे, हे एकच काम ते करू शकतात. परंतु आज मात्र लोकांना कळले आहे की, पुष्कळदा अंधत्य टाळता येण्याजोगे आणि बरे होण्याजोगे असते. पौष्टिक आहार व योग्य वेळी डॉक्टरांकडून मिळालेली वैदयकीय मदत अनेक बालकांना अंधत्वापासून वाचवू शकते. आज आपल्या मृत्यूनंतर आपले नेत्रदान नेत्र बँकांना करण्यासाठी लोक पुढे येत आहेत. अशा रितीने अनेक अंध व्यक्तींना दृष्टी देण्यास ते मदत करीत आहेत.
0 Comments