Subscribe Us

इयत्ता 5 वी नवोदय प्रवेश परीक्षा | उतारा-43 | Navoday Pariksha | Utara-43


 उतारा - 43

इ. स. 1921 मध्ये अलेक्झांडर फ्लेमिंगने पेनिसिलीनचा शोध लावला. मानवाने शोध लावलेल्या अत्यंत उपयोगी औषधांपैकी हे एक औषध आहे. बॅक्टेरियामुळे चिघळलेल्या ज्या जखमा दुसऱ्या कोणत्याही रितीने बऱ्या होत नसत, अशा जखमा पेनिसिलीनमुळे बऱ्या होतात. प्रत्येक प्रकारच्या बॅक्टेरियाचा नाश या औषधाने होत नसला, तरी जखमांमधील खास प्रकारच्या जीवाणूंना पेनिसिलीन मोठ्या प्रमाणात नष्ट करते. सुरुवातीला या शोधाची माहिती फारच थोड्या लोकांना होती. जखमी सैनिकांचे प्राण वाचवण्याची शक्ती पेनिसिलीनमध्ये होती. त्यामुळे युद्धात ते उपयोगी पडत असे. पेनिसिलीन तयार करण्यासाठी अनेक कारखाने स्थापन करण्यात आले.त्यांच्या मदतीने तयार झालेल्या या औषधामुळे हजारो सैनिक व लोकांचे प्राण वाचू शकले आणि मानवजातीवरील अनेक संकटे दूर झाली.

Post a Comment

0 Comments