उतारा 42
आई मला साबण लावत होती आणि मी स्नानगृहात उभी होते. जणू काही तिने जंतूंच्या विरुद्ध युद्धच पुकारले होते. आईने दगडावर चोळून चोळून धुतलेली चादर मी मळवू नये, म्हणून आईला मला अगदी स्वच्छ बनवायचे होते. एकदाची माझी अंघोळ उरकल्यावर मी माझ्या अंथरुणावर एकटीच पडून राहिले. मी माझ्या उशीबरोबर बोलले, मग एका काल्पनिक मित्राशी आणि शेवटी पलंगाखाली असलेल्या दोस्त ड्रॅगनशी. माझ्या आईला स्वच्छतेचे वेड होते आणि घरामध्ये ती धुळीचा एक कणदेखील राहू देत नसे. धुळीविरुद्धची तिची लढाई ही तिच्या स्वयंपाकाविषयीच्या आवडीसारखीच होती. तिने अगदी काळजीपूर्वक केलेल्या स्वयंपाकाच्या वासाने आमचे घर नेहमी भरलेले असायचे. तिचे केक, बिस्किटे आणि कपकेक हे शेजाऱ्यापाजाऱ्यांच्या चर्चेचा विषय असायचे. तिचे केक आणि माझ्या तोंडात विरघळणारी चॉकलेटची कुकी यांची मी भोक्ती होते. ती फार उदार होती आणि तिने ताज्या बनवलेल्या बिस्किटांचा लाभ शेजाऱ्यांनाही मिळायचा.
0 Comments