उतारा - 40
एका दुपारी एका व्यापाऱ्याला आपल्या स्वयंपाकघरात एक साप आढळला. त्याला कसे ठार मारायचे, हे त्या व्यापाऱ्याला माहीत नव्हते. म्हणून त्याने त्या सापाला एका भांड्याखाली झाकले आणि तेथेच ठेवले. नंतर तो आपल्या मित्रांना भेटण्यासाठी बाहेर गेला. त्या रात्री काही चोर त्या व्यापाऱ्याच्या घरात शिरले.ते स्वयंपाकघरात शिरले आणि त्यांनी ते भांडे पाहिले. "अहाहा!" ते उद्गारले, "व्यापाऱ्याने इथे काहीतरी मौल्यवान लपवून ठेवले आहे. चला, आपण ते घेऊ या."त्यांनी ते भांडे उचलले आणि त्या सापाने त्यांना दंश करण्याचा प्रयत्न केला. चोर घराबाहेर पळाले. त्यांना काहीही चोरता आले नाही.
0 Comments