उतारा - 39
मला तू पुढल्या बुधवारी रात्री नऊ वाजता सुलतानच्या घरी भेट. माझ्या काही गोष्टी तू निपटाव्यास, अशी माझी इच्छा आहे. आणि तसेच, माझ्या उपकरणांची थैली तुला भेट दयावी, अशी माझी इच्छा आहे. मला माहीत आहे तुला ती मिळाल्याचा आनंद होईल; एक हजार डॉलर खर्च करूनसुद्धा तशी उपकरणे तू बनवू शकला नाही. बिली, मी जुना धंदा एक वर्षापूर्वी सोडला. आता माझे एक छानसे दुकान आहे. मी प्रामाणिकपणे उपजीविका करतो आहे आणि जगातल्या सगळ्यात सुंदर मुलीशी आजपासून एक आठवड्याने माझे लग्न होणार आहे. हेच खरे जीवन आहे, बिली, सरळमार्गी जीवन. शेवटी मी चोरीचा व्यवसाय सोडून दिला आहे आणि दहा लाख डॉलर्ससाठीदेखील तो पुन्हा अंगीकारणार नाही. सुलतानकडे नक्की हजर राहा, कारण मला तुला भेटायचेच आहे. मी उपकरणे बरोबर घेऊन येईन.
तुझा जुना मित्र,
0 Comments