उतारा - 38
एकदा एक व्यापारी भगवान बुद्धाकडे गेला आणि त्यांना शिव्या देऊ लागला. त्या व्यापाऱ्याने भगवान बुद्धांना शिव्यांची लाखोली वाहिली; पण ते काहीच बोलले नाहीत.जेव्हा तो व्यापारी शिव्या देऊन थकला, तेव्हा भगवान बुद्धांनी त्याला विचारले, "बंधो, तू तुझ्या घरी कधी पाहुण्यांचे आदरातिथ्य करतोस का?" तो उत्तरला, "हो, करतो तर!" मग भगवान बुद्धांनी विचारले, "तू त्यांना काही खाणंपिणं देतोस का?" तो व्यापारी त्यावर म्हणाला, "हो." नंतर भगवानांनी त्याला पुन्हा विचारले,"तू त्यांना जे देतोस ते त्यांनी स्वीकारले नाही; तर तू काय करतोस?" तो व्यापारी उत्तरला, "काय पण हास्यास्पद प्रश्न आहे! जर त्यांनी त्याचा स्वीकार केला नाही; तर ते आमचे खाणेपिणे आमच्याकडेच राहते." मग भगवान बुद्ध हळुवार आवाजात म्हणाले, "तू जे काही आता दिलेस ते तुझ्याजवळच राहिले." त्या व्यापाऱ्याला लाज वाटून त्याने भविष्यात कधीही घाणेरडी भाषा न वापरण्याची प्रतिज्ञा केली.
0 Comments