उतारा - 37
मी जवळजवळ सहा वर्षांचा होतो. एकदा मी एका पुस्तकात एक सुंदर चित्र पाहिले. ते एका घनदाट जंगलाचे चित्र होते. मी जंगलाविषयी विचार केला आणि एका जंगली प्राण्याचे चित्र काढले. ते मी काही मोठ्या माणसांना दाखवले आणि त्यांना विचारले, "तुम्हांला याची भीती वाटते का?" पण त्यांनी मला विचारले, "भीती? कुणाला उगीचच एखादया हॅटची का भीती वाटेल?"मी काही हॅटचे चित्र काढलेले नव्हते. माझ्या दृष्टीने तर तो एक हत्ती होता. पण मोठ्या माणसांना ते समजलेच नाही. त्यांच्यापैकी एकाने मला सल्ला दिला, "चित्रे काढायचे सोडून दे. त्यापेक्षा भूगोलात, गणितात किंवा व्याकरणात लक्ष घाल." म्हणून तर मी चित्रे काढायचे सोडून दिले. म्हणून तर मी एक महान कलावंत नाही बनू शकलो.
0 Comments