उतारा - 36
कोळी हे कीटक नव्हेत, ही गोष्ट तुम्हांला माहीत आहे? खरं म्हणजे ते आठ पाय आणि विष असलेल्या, कीटकांशी संबंधित अशा प्राण्यांचा समूह आहेत. कोळ्यांचे वेगवेगळे प्रकार असतात. ते जगात सर्वत्र राहतात आणि जवळजवळ प्रत्येक वस्तीत सापडतात. त्यांना अंधाऱ्या जागा आवडतात, ज्यांमध्ये तुमचे घर, कपाटे किंवा एखादया तळघराचाही समावेश होऊ शकेल.कोळी फार गमतीदार असतात. भक्ष्याला पकडून खाण्यासाठी काही रेशीमजाळी गुंफतात, तर दुसरे काही भक्ष्यावर सरळ आक्रमण करतात. काही कोळी पाली आणि उंदीर यांना खाण्याइतकेही मोठे असतात. अनेक लोकांना कोळ्यांची भीती वाटते. कारण ते चावतात. तथापि, बरेचसे कोळी स्वतःला धोका आहे असे वाटल्यावरच चावतात, तर बरेचसे निरुपद्रवी असतात. खरं म्हणजे कोळी लोकांना मदत करतात, कारण त्यांच्यापैकी बरेच कोळी झुरळे आणि डास अशा कीटकांना खाऊन टाकतात.
0 Comments