उतारा - 35
राजा विश्वामित्र प्राण्यांची शिकार करण्यासाठी त्यांच्या सेवकांसह जंगलात गेले. जंगलामध्ये शिकारीसाठी खूप फिरले: परंतु ते एकाही प्राण्याला पकडू शकले नाहीत. शेवटी ते खूप थकून गेले. सेवक पाण्याच्या शोधात निघाले. सेवक म्हणजे राजाची सेवा करणारे. त्यांना फिरता फिरता दूरवर एक झोपडी दिसली. पाण्याच्या शोधात ते त्या झोपडीपर्यंत जाऊन पोहोचले. त्या झोपडीमध्ये त्यांना एक ऋषी दिसले. ते वशिष्ठ ऋषी होते. त्यांनी सेवकांना पाहिल्यानंतर त्यांची विचारपूस केली. ते फार दयाळू होते. त्यांनी राजाला बोलावून त्याची जलतृप्ती केली. जलतृप्तीनंतर राजा व त्याचे सेवक वनातून बाहेर पडले.
0 Comments