उतारा - 34
एकदा एका जंगलात नदीकाठावर एक सुंदर सोनेरी हरीण राहत होते. एका रात्री त्याने मदतीसाठी मारलेल्या हाका ऐकल्या. ते त्या आवाजाच्या दिशेने धावले आणि त्याला नदीत बुडत असणारा एक माणूस आढळला. त्याने त्याला ओढून पाण्याच्या बाहेर काढले. "माझे प्राण वाचवल्याबद्दल मी तुझे आभार कसे मानू?" तो माणूस, म्हणजे व्यापारी म्हणाला. "माझ्याविषयी कोणाला सांगू नकोस, हरीण म्हणाले. व्यापाऱ्याने तसे वचन दिले आणि आपल्या मागनि तो निघून गेला. काही आठवड्यांनंतर एका सोनेरी हरणाबद्दल माहिती देणाऱ्याला खूप मोठे बक्षीस राजाने जाहीर केले. राजाला ते पकडायचे होते. व्यापारी ताबडतोब राजाकडे गेला आणि त्याने हरीण कोठे सापडेल, याची राजाला माहिती दिली.
0 Comments