उतारा - 33
पेंग्विन बर्फाच्छादित दक्षिण ध्रुवावर राहतात. तुम्हांला याचे कधी नवल वाटले आहे का, की तुम्ही एखाद्या थंड प्रदेशाला भेट देताना जे लोकरीचे कोट, स्वेटर आणि हातमोजे घालता त्यांच्याविना इतक्या गोठवणाऱ्या खंडावर पेंग्विन कसे राहतात ? पेंग्विन बुटाशिवाय बर्फावरून चालू शकतात आणि ते कधीच आजारी पडत नाहीत.त्यांना कुठलेही घर नसते, म्हणून ते बर्फावर झोपतात. निसर्गाने त्यांना फार निराळी शरीरवैशिष्ट्ये दिलेली आहेत की ज्यांमुळे ते कमाल थंड हवामानात अडचणीविना तग धरू शकतात. यामागे असणारे रहस्य म्हणजे त्यांचे शरीर चरबीच्या जाड थराने आच्छादलेले असते, त्याने ते उबदार राहते. तो एखादया फर-कोटाप्रमाणे काम करतो.पेंग्विन आपल्या अंड्यांना आणि पिल्लांना पूर्णपणे समर्पित असतात. अन्य प्राण्यांच्या विरुद्ध पेंग्विनची मादी अंडी उबवत नाही की आपल्या पिल्लांना भरवत नाही. ती फक्त एक अंडे घालते आणि मग नर पेंग्विन ते उबवतो. पेंग्विनची मादी मग आपल्या नवऱ्यासाठी आणि बाळासाठी अन्न आणण्याकरिता लांब लांब जाते. प्रचंड हिमवर्षावामुळे तिला खूप दूरवर प्रवास करावा लागतो.
0 Comments