उतारा - 32
भारत अतिप्राचीन संस्कृतीपैकी एक आहे. अनेक देशांतील लोक इथल्या महान आचार्यांकडून शिक्षण घेण्यासाठी भारतात येत. कारण भारत हे विट्धेचे केंद्र होते. त्या काळात भारत लहान-मोठ्या व्यापाराचेही केंद्र होते. भारतीय माल सर्व जगभर प्रसिद्ध होता. पूर्वेकडचे आणि पश्चिमेकडचे व्यापारी खुश्कीने आणि समुद्रमार्गे येत. ते भारतीय माल खरेदी करायला येत. भारत पुन्हा व्यापार आणि उद्धोगाचे केंद्र बनत आहे. भारतीय माल अनेक देशांकडे निर्यात केला जातो. अनेक भारतीय तंत्रज्ञ आणि शास्त्रज्ञ परदेशांत काम करतात.
0 Comments