उतारा -31
सुमारे 2000 वर्षांपूर्वी रोमन जहाजांनी व्यापाराच्या शोधात मलबारचा किनारा आणि तमिळनाडूचा पूर्व किनारा येथे भेट दिली. या काळात सर्व भूमध्य प्रदेशांवर रोमच्या साम्राज्याची सत्ता होती आणि रोमच्या बाजारामध्ये भारतीय चैनीच्या मालाला मोठी मागणी होती. रोमनांना भारताकडून सर्वाधिक हवा असलेला माल म्हणजे मसाले, कापड, मौल्यवान खडे, मोरासारखे पक्षी आणि माकडासारखे प्राणी. रोमन जहाजे लाल समुद्राकडून अरबी समुद्र ओलांडून मलबार किनाऱ्याला किंवा पूर्व किनाऱ्याला येत असत. रोमन लोक आपल्याला हव्या असलेल्या मालांनी जहाजे भरून घेत. त्यासाठी सोने देऊन किंमत वं चुकती करीत आणि रोमला परत जात. रोमच्या सोन्याने दक्षिण भारतातली राज्ये खूप श्रीमंत झाली.
0 Comments