Subscribe Us

इयत्ता 5 वी नवोदय प्रवेश परीक्षा | उतारा-29 | Navoday Pariksha | Utara-29

उतारा - 29

आपल्या ग्रामीण भागांतील बहुसंख्य जनता गरीब आणि अज्ञानी आहे. नेहमीच पैशांची चणचण असल्यामुळे चांगली खते व बियाणी शेतकरी विकत घेऊ शकत नाही. त्याच्या गरिबीचा फायदा घेऊन भरमसाट व्याज आकारणाऱ्या सावकाराकडून त्याला कर्ज घ्यावे लागते. अशा प्रकारे शेतकऱ्याचे जीवन कर्जाच्या बोज्याखाली दबलेले असते. शेतकरी त्याच्या अज्ञानामुळे नवीन शेतकीपद्धती आत्मसात करू शकत नाही आणि म्हणून तो आपले उत्पादनही वाढवू शकत नाही. परिणामी, त्याचे उत्पन्न कमी राहते. हे आर्थिक प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न सरकार करीत आहे. याखेरीज लोकांनीही आपल्या अडचणी दूर करण्यासाठी मेहनत घेतली पाहिजे. हे प्रश्न सोडवण्यास सहयोग व एकत्र काम करण्याची वृत्ती बरीच उपयोगी पडू शकेल.सहयोग देण्यास लोक तयार असतील, तर कोणतीही गोष्ट अशक्य वाटणार नाही.

 

Post a Comment

0 Comments