Subscribe Us

इयत्ता 5 वी नवोदय प्रवेश परीक्षा | उतारा-28 | Navoday Pariksha | Utara-28

 उतारा 28 

एके दिवशी बापूंचे सहकारी श्री. पोलक यांनी गांधीजींच्या मणिलाल नाव असलेल्या तेरा वर्षाच्या मुलाला आपल्या कार्यालयातून एक पुस्तक घेऊन येण्यास सांगितले. पण संध्याकाळी श्री. पोलक यांनी आठवण करून देईपर्यंत मणिलाल पूर्णपणे विसरून गेला. गांधीजींना त्याचद्दद्दल समजले आणि ते म्हणाले, "बाळ, रात्र अंधारी आहे आणि रस्ता लांबचा आणि सुनसान आहे. तुला जवळजवळ सहा मैल चालावे लागेल, पण तू. श्री. पोलक यांना शब्द दिला आहेम. तू त्यांचे पुस्तक घेऊन यायचे कबूल केले आहेस. आता जा आणि ते घेऊन ये."बा आणि कुटुंबीयांनी जेव्हा बापूंचा निर्णय ऐकला, तेव्हा ते अस्वस्थ झाले, त्यांना ठाऊक होते की, एकदा बापूंनी विश्चय केला की कुणीच तो बदलू शकणार नाही. दयाळू आणि सौम्य असणारे बापू वेळप्रसंगी दगडासारखे कठोर बनायचे. मणिलालने आपला शब्द पाळला आणि तो कबूल केल्याप्रमाणे वागला, हे त्यांनी पाहून घेतले.

Post a Comment

0 Comments