उतारा - 27
माणसाचं मन कसं असतं? त्या विषयाचे प्राध्यापक पहिल्या दिवशी शिकवताना विद्याथ्यर्थ्यांना प्रश्न विचारत, "मुलांनी, तुम्हांला या फळ्यावर काय दिसते आहे?"फळयावर एक मोठा पांढरा कागद लावलेला असे व त्या कागदावर एक छोटासा ठिपका असे. फळ्याकडे पाहून मारी मुले म्हणत, "काळा ठिपका, सर." मग ते प्राध्यापक म्हणत "माझ्या मित्रांनो, तुम्हांला फक्त छोटासा काळा ठिपका दिसला, त्याच्याभोवती कागदाचा एवढा मोठा पांढरा (कागद) भाग आहे, त्याकडे तुमचे लक्ष गेले नाही. सुख-दुःखाचे असेच आहे. माणसाला आपल्या जीवनातले दुःख दिसते, जीवनातल्या सुखाकडे त्याचे लक्ष जात नाही."
0 Comments