उतारा 26
सहा दिवस सततच्या पावसानंतर, नरेनच्या शेताजवळचा छोटा ओढा एका क्रुद्ध नदीमध्ये परिवर्तित झाला होता•सहाव्या दिवसाच्या सायंकाळी, जेव्हा तो आपल्या गाईंना उंचावरच्या जमिनीकडे घेऊन चालला होता तेव्हा तो एका झाडाच्या बोडाशी धडकला आणि पडला. एकदोन क्षण त्याची शुद्ध हरपली. जेव्हा तो सावध झाला, तेव्हा त्याची एक म्हातारी गाय पानू त्याचे मुख चाटत होती. अवतीभवती सगळीकडे पाणी वाढत होते.
नरेनच्या डोक्याला लागले होते आणि तो हालचाल - करण्यासाठी धडपडत होता. काही मिनिटांच्या नंतर, त्याने भानूच्या गळ्याभोवती हात टाकला आणि लटकण्याचा प्रयत्न केला. अखेरीस, भानू स्वतःला आणि नरेनला पाण्याबाहेर कोरड्या जमिनीवर ओढून नेण्यात यशस्वी झाली. त्या छोट्याशा बेटावर नदीच्या मध्यावर, नरेन आणि त्याची गाय कुणीतरी आपल्याला सोडवायला येईल म्हणून वाट पाहत राहिले.
0 Comments