Subscribe Us

इयत्ता 5 वी नवोदय प्रवेश परीक्षा | उतारा-23 | Navoday Pariksha | Utara-23

उतारा - 23

श्रीधरला कुत्र्यांची भीती वाटत होती. तो जेव्हा पाच वर्षांचा होता, तेव्हा त्याच्या शेजाऱ्याच्या कुत्र्याने त्याच्यावर उडी मारली होती आणि त्याला ते चावले होते. आता त्याचे काका 'कॉफी' नावाची त्यांची कुत्री त्याला देत होते; कारण ते ऑस्ट्रेलियाला जाणार होते आणि कुत्री त्यांच्याबरोबर नेऊ शकत नव्हते. सौम्य डोळ्यांची कॉफी गडद तपकिरी रंगाची होती आणि तिला मुले आवडायची.

जेव्हा त्याच्या काकांनी कॉफीला घरी आणले, तेव्हा प्रत्येकाने तिच्या पाठीवरून हात फिरवला. स्मिताने तिला उराशी घट्ट परले. आईने तिला थोडे दूध दिले. वडिलांनी तिच्या कानांना गुदगुल्या केल्या. कॉफीने शेपूट हलवले. श्रीधर कोपऱ्यात बसून होता. तीच एकटा असा होता की, ज्याने तिला हात लावला नव्हता. 

अचानक कॉफी त्याच्याकडे गेली आणि तिने त्याचा हात चाटला. श्रीधर जवळजवळ ओरडलाच. नंतर ती त्याच्या पायाजवळ बसली. काका हसले. "श्रीधर," ते म्हणाले, "तिला तू आवडला भाहेस.तिला फिरायला घेऊन जा. तू तिची काळजी घेतलीच पाहिजे. मी गेल्यानंतर तिला वाईट वाटेल." श्रीधर हसला. त्यानंतर ती कधीच घाबरला नाही.

 

Post a Comment

0 Comments