उतारा -२०
सर्व हंसाचे कौतुक करतात आणि मला काळा म्हणतात. मी हंसापेक्षा वेगाने उडू शकतो. मी त्याला आव्हान देऊन त्याचा पराभव करीन.
मग लोक माझे कौतुक करतील आणि त्याचा अपमान करतील, असा विचार करून कावळ्याने हंसाला आपल्याबरोबर समुद्राच्या मध्यभागी असलेल्या एका बेटापर्यंत उडण्याचे आव्हान दिले.
हंसाने या गोष्टीला नकार दिला; पण कावळ्याने हट्ट धरला, म्हणून दोघेही आकाशात उडाले. सुरुवातीला खूपच वेगाने उडत कावळा हंसाच्या पुढे गेला. हंस आपल्या नेहमीच्या वेगाने उडत होता.
लवकरच कावळा थकला आणि पडू लागला. त्याची क्यू येऊन हंसाने कावळ्याला आपल्या पंखावर घेतले आणि त्या बेटापर्यंत सुरक्षितपणे उडवून नेले. कावळ्याला स्वतःची लाज वाटली.
0 Comments