उतारा-१८
कन्याकुमारी हे एक सुंदर स्थान आहे. ते तीन वाजूने समुद्राने वेढलेले आहे. दक्षिणेकडे हिंदी महासागर पसरलेला आहे; पूर्वेला बंगालचा उपसागर आहे आणि पश्चिमेला अरबी समुद्र.
देशाच्या अनेक भागातले यात्रेकरू येथे तीन समुद्रांच्या संगमाच्या ठिकाणी स्नान करण्यासाठी आणि मंदिरात पूजा करण्यासाठी येतात. कन्याकुमारी भोवताल चा समुद्र सर्वसाधारणपणे शांत असतो;
भेट देणाऱ्या अनेकांना जाणवले आहे की, या जागी एक विशिष्ट शांतता आणि स्तब्धता सदैव वसते. या ठिकाणच्या सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी सूर्योदयाच्या आणि सूर्यास्ताच्या वेळा या सर्वोत्तम वेळा होत.
सूर्य सकाळी बंगालच्या उपसागरातून उगवतो आणि संध्याकाळी अरबी समुद्रात मावळतो. खरंतर भारतात हे एकच असे ठिकाण आहे की, जेथून सूर्य समुद्रातून उगवताना आणि समुद्रात मावळताना पाहता येतो.
कन्याकुमारीला येणारे अनेक जण पौर्णिमेच्या दिवशी येतात. त्यांना दोन अग्नीगोलांसारखे दिसणारे अरबी समुद्रात बुडणारा सूर्य आणि बंगालच्या उपसागरातून वर येणारा चंद्र एकाच वेळी पाहता येतात.
0 Comments