उतारा-८
दीपक उल्हासित होता. तो त्याचे काका आणि चुलत बहिणी प्रीता वरिया सोभत रविवारी सहलीला जात होता. त्याने आपले पोहण्याचे सामान, खाऊ आणि खेळण्याचे सामान एका पाठीवरील बॅगेत ठेवले होते. ते सकाळी सहा वाजता निघाले. बरेच दूरपर्यंत गाडीने प्रवास केल्यानंतर ते सहलीच्या ठिकाणी सकाळी नऊ वाजता पोहोचले. त्या गावात एक फार्म हाऊस होते. गावाच्या अवतीभोवती फिरून त्यांनी भाताची शेत पाहिली आणि भाताचे पीक कसे पिकवले जाते, ते समजून घेतले. त्यांनी झाडावर चढवून आंबे व पेरू तोडले. दुपारी एका झाडाखाली बसून ते जेवले. जेव्हा काकांनी सांगितले की, आता घरी परतण्याची वेळ झाली आहे, तेव्हा त्यांना अजून बराच वेळ तिथे थांबायचे होते; कारण त्यांना ते गाव खूप आवडले होते.
0 Comments