Subscribe Us

इयत्ता 5 वी नवोदय प्रवेश परीक्षा | उतारा-5 | Navoday Pariksha | Utara-5


 उतारा-५

जनतारुपी जनार्दनाची जो मनोभावी सेवा करतो, तोच ईश्वराला प्रिय होतो. आज या जगात अशी लक्षावधी माणसे आहेत की, त्यांना तुमच्या आमच्या मदतीची गरज आहे. कुणी किरकोळ आजारी, कुणी रोगी, कुणी लुळे तर कोणी थांबले! आंधळी ,बहिरी ,मुखी, मागासलेली अनाथ पोर! समाजात अशांना कोणी जवळ करीत नाही. पण त्यांना विजय मर्चंट यांनी जवळ करून प्रचंड कार्य केले. या लोकांना विजय मर्चंट देव वाटत होते; पण विजय मर्चंट यांनी जनतेलाच देव मानले. अशा असहाय समाजाची सेवा करणे, त्यांना मदत करणे, त्यांच्या उदास जीवनात उत्साह उत्पन्न करणे, एवढेच नव्हे, तर त्यांना स्वावलंबी, आत्मनिर्भर बनवणे हेच खरे महत्त्वाचे कार्य आहे. त्यांना कोरडी सहानुभूती नको, त्यांच्या उद्धाराची आच नको; तर त्यांना जवळ करणारा सतत प्रोत्साहन देणारा बंधुभाव हवा.

Post a Comment

0 Comments