Subscribe Us

इयत्ता 5 वी नवोदय प्रवेश परीक्षा | उतारा-14 | Navoday Pariksha | Utara-14

 

उतारा-१४

परतताना सिकंदराची भेट एका साधूची झाली. साधू एका खरखरीत गवती चटईवर बसून ऊन खात होता. सिकंदर त्याच्या समोर उभा राहिला आणि त्याला वाटले की, साधू आता मला प्रणाम करील, पण त्याने असे काहीच केले. त्या ऐवजी त्याने म्हटले, "कृपा करून एका बाजूला उभे राहा. ऊन माझ्यापर्यंत येऊ द्या. "सिकंदर ने रागाने विचारले, "माहित आहे का मी कोण आहे? "साधूने काहीच उत्तर दिले नाही. "मी एक सम्राट आहे-महान सिकंदर,"त्याने म्हटले. "सम्राट !तू !नाही, तू नाहीस," साधने म्हटले. "होय, मी आहे,"सिकंदर म्हणाला,"मी अर्धे जग जिंकले आहे."यावर साधूने शांतपणे म्हटले,"सम्राट तुझ्यासारखे अस्वस्थपणे हिंडत नसतात.जा बाबा, जा, लोकांच्या हृदयावर प्रेमाने विजय प्राप्त कर."सिकंदर ने प्रणाम केला आणि तो मुकाट्याने निघून गेला. 

Post a Comment

0 Comments