उतारा-१०
तुम्ही कधी रस्सी-खेच हा खेळ खेळला आहात? हा एक रंजक खेळ आहे. रस्सीखेच हा खेळ खेळण्यासाठी तुम्हाला मोकळी जागा, एक लांब व मजबूत रस्सी आणि दोन गटांची आवश्यकता असते. खेळ तेव्हाच रंगतो, जेव्हा दोन्ही गट एक सारख्या ताकदीचे असतील. दोन्ही गटांच्या मधोमध एक रेष आखली जाते. जो गट रस्सी सोबत ओढला जाऊन रेषेच्या पलीकडे खेचला जातो तो गट पराजित होतो. गटातील सर्वात ताकदीच्या खेळाडू ने रशीच्या शेवटच्या टोकाला घट्ट पकडून ठेवणे आणि सगळ्यांनी मिळून रस्सी खेचणे गरजेचे असते. खेळण्याच्या जागेवरील दगड धोंडे बाजूला काढून टाकले पाहिजेत; नाहीतर दुखापत होऊ शकते.
0 Comments