सतपुरुष म्हणाला ,"बाबांनो या गरीब बिचाऱ्या सशानं तुमचा कोणताही अपराध केलेला नाही. हा आपल्या सवंगड्यांबरोबर या रानावनात राहतो. गवत -पाला खातो. ओढ्याचं निर्मळ पाणी पितो आणि हसत बागडत असतो. कुणालातरी यानं त्रास दिला आहे का ? सांगा पाहू ! मग कशाकरता याचा जीव घ्यायचा ?" पारध्यांनी त्या सत्पुरुषाची क्षमा मागितली. यापुढे आपण प्राण्यांची हत्या करणार नाही ,अशी प्रतिज्ञाही त्यांनी केली. पारधी निघून गेल्यावर त्या सत्पुरुषाने आपल्या मांडीखाली दडलेल्या सशाला वात्सल्याने कुरवाळले तेव्हा तोंड उडी मारून जंगलात दिसेनासा झाला.
0 Comments