कृष्णेचे कुटुंब भले मोठी आहे .कितीतरी लहान मोठ्या नद्या तिला येऊन मिळतात. गोदावरी प्रमाणेच कृष्ण नाही महाराष्ट्र माता म्हणता येईल. नरसोबाच्या वाडीला जात असताना गाडी नावेवर चढवून आम्ही कृष्णा पार केली होती. ते कृष्णचे दुसरे दर्शन एका बाजूला उंच धरण आणि दुसऱ्या बाजूला दूरवर पसरलेला गाळाचा विस्तार व त्यात होणारी वांगी काकड्या कलिंगडे टरबूजे यांचे अमृतमळे कृष्णा काठाची ती वांगी ज्याने एकदा चाखली की त्याला वारंवार खावीशी वाटते .सतत एक दोन महिने ती सारखी खात राहिलो तरीही तृप्ती होणार नाही ,मग वीट येणे दूरच राहिले.
0 Comments