आज दुर्दैवाने आपण कष्टांना कमी दर्जाचे मानतो. जे श्रमजीवी आहेत त्यांना फारशी संपत्ती मिळत नाही त्यांची फारशी भरभराट होत नाही असे चित्र दिसते. आणि बुद्धिजीवी म्हणून काम करणारे खूप पैसा मिळवताना दिसतात, परंतु श्रम कमी दर्जाचे असतात. हे कारण त्यामागे नाही आपला समाज तसेच समजतो हे त्यामागील कारण आहे. आपला समाज श्रमाला कमी लेखतो श्रम करून पोट भरणाऱ्यांना मोबदला कमी दिला जातो म्हणून समाजाचा दृष्टिकोन बदलणे आवश्यक आहे .त्याचे प्रबोधन करणे आवश्यक आहे. श्रमातून सुखाची निर्मिती होते, जगातील सर्व महान कार्य माणसाच्या श्रमातून निर्माण झाली आहेत. श्रम करणारा पुढे जातो त्याचीच प्रगती होते तोच अखेरीस विजयी होतो.
0 Comments