आपल्या कामाची आखणी करणे, किती वेळात काम संपेल त्याचे नियोजन करणे आणि ठरवल्याप्रमाणे काम पार पाडण्याचा प्रयत्न करणे म्हणजे वक्तशीरपणा होय .औद्योगिकीकरण आणि शहरीकरण यामुळे आता तर जीवन खूप गतिमान व गुंतागुंतीचे बनले आहे त्यामुळे सध्याच्या युगात वक्तशीरपणाला पर्याय नाही . वेळेत कामे पार पाडली नाहीत तर आपण फक्त आपलेच नुकसान करतो असे नव्हे तर आपल्याबरोबर आपण इतरांचेही नुकसान करतो म्हणून आपल्या कामाचे नियोजन करून ती वेळच्यावेळी पार पाडण्याचा कसोशीने प्रयत्न करायला हवा . हाच वक्तशीरपणा होय वक्तशीरपणा न पाळणे म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेणे होय.
0 Comments