ताज्या भाज्यांचे ढीग आपल्याला सौंदर्याचे दर्शन घडवतात त्या भाज्यांमधील विविधता माझ्या मनाला खुलवते भोपळी मिरचीचा रुबाब केवढा सगळ्या भाजीची ती राणीच जणू तिच्यात आता रंगाची विविधता आले आहे पिवळी भोपळी मिरची तांबडी भोपळी मिरची या मिरच्या नुसत्या जेवणाच्या टेबलाची शोभा वाढवतात असे नाही तर भाजीच्या दुकानाची ही शोभा वाढवतात कोबी फ्लॉवर यांचे गड्डे तांबडा भोपळा दुधी भोपळा आणि कोहळा हे जवळीक साधत असतात पडवळ आणि विविध शेंगांच्या भाज्या दुकानात पसरलेल्या असतात वांग्याचे रंग आणि आकार यात किती विविधता घोसाळी दोडकी भेंडी तोंडली आपले अस्तित्व दाखवत असतात.
0 Comments