एडिसनने विजेच्या दिव्याचा शोध लावला. त्यासाठी परा कोटीचे परिश्रम घेतले. त्याला अक्षरशः शेकडो वेळा अपयश आले पण तो थकला नाही. थांबला नाही, त्याची इच्छाशक्ती जबरदस्त होती. प्रत्येक अपयशा नंतर तो नव्या जोमाने प्रयोग करीत असे. अखेरीस साडे अकराशे प्रयोगानंतर त्याला यश आले. एडिशनच्या या शोधाने माणसाच्या जीवनात अमुलाग्र बदल झाला. एडिसनच्या मनात तीव्र इच्छा होती ,म्हणून तो यशस्वी झाला, इच्छेचे सामर्थ्य प्रचंड असते .आपण हे लक्षात घेतले पाहिजे. जो चालतो त्याचे भाग्यही चालते. जो थांबतो तो संपतो. धावत्याला शक्ती येईल आणि रस्ता सापडे ! या उक्तीद्वारे हेच सांगितले आहे की माणसाने सतत प्रयत्न करीत राहिले पाहिजे. अपयशाने खचून न जाता पुढे पुढे जात राहिले पाहिजे.
0 Comments