मरावे परी कीर्तिरूपे उरावे या समर्थांच्या मुक्ती नुसार दुसऱ्यांचे अश्रू जाणू लागलो आणि ते पुसू लागलो की आपली कितीही वाढत जाते .मानव सेवा करावयास सुरुवात केली पाहिजे. आपल्याबरोबर सर्वांचे भले व्हावे हा भाव आपल्या मनात जागृत झाला पाहिजे त्या पद्धतीने आपली वाटचाल झाली पाहिजे.सर्वांचे भले करण्याचे चिंतन करू लागलो की आपली प्रतिष्ठा वाढते. मुद्दाम कीर्ती मिळवण्याचा प्रयत्न करू नका आपले सत्कार्य मूकपणाने करा म्हणजे निश्चित कीर्ती शिल्लक राहील .मोठेपणाची अपेक्षा काढून टाकल्याने मोठेपणा वाढत असतो .साधुसंत समाजाच्या कल्याणासाठी चंदनासारखे झिजले म्हणून त्यांचा कीर्ती सुगंध हा आजही दरवळत आहे. निष्ठेने काम केले की कीर्ती आपल्या पाठीमागे धावते. माणसाचा गौरव त्याच्या कार्यामुळे वाढत असतो. प्रत्येक कामात आपण जीवन ओतला की आपली कीर्ती निश्चितच वाढू लागेल.
0 Comments