जग हा एक खुला ग्रंथ आहे. जगात जेवढे आपण हिंडाल फिराल भ्रमण कराल प्रवास कराल व जेवढे जग आपण डोळ्यांनी पहाल, वाचाल, अनुभवाल व त्याबाबत कानाने ऐकाल, तेवढी तुमच्या ज्ञानात लवकिकता भर पडेल .ज्ञानाची कक्षा रुंदावेल, वैचारिक पातळी वाढेल, मन विशाल होण्यास मदत होईल, आणि सर्व जगाकडे पाहण्याचा नवा दृष्टीकोन तयार होईल आणि म्हणूनच जगभर भ्रमण करणे ,प्रवास करणे हे ज्ञानार्जनासाठी ज्ञान वृद्धीसाठी ज्ञानाची कक्षा रुंदावण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. प्रवाशाने अनुभव विश्व समृद्ध होते देशाटन केल्याने नित्य नूतन अनुभव घेण्याची दुर्मिळ संधी आपल्याला मिळते. आपल्या ज्ञानेंद्रियांचा उपयोग जाणीवपूर्वक केला तर आपल्या ज्ञानात अनुभवतात सतत भर पडते. विचारांची देवाणघेवाण लोकसंग्रह लोकजागृती ज्ञानसंचय जागृती ज्ञान संचय या गोष्टी आपल्याला देशाटणाने लावतात.
0 Comments