डॉल्फिन हा खोल समुद्रात राहणारा मासा आहे. त्यांची लांबी सुमारे दहा फूट असते. त्याचे तोंड पक्षाच्या चोची सारखे असते .त्याचा पोहण्याचा वेग ताशी सरासरी 30 मेल असतो. काही वेळा तर ते ताशी 40 ते 60 मैल वेगाने पोहतात,.डॉल्फिन मासा इतर माशांसारखा अंडी घालत नाही. तर तो सस्तन प्राणी आहे. माशांप्रमाणे त्याला कल्लेही नसतात. श्वास घेण्यासाठी मधून मधून त्याला पाण्याबाहेर यावे लागते. डॉल्फिन विभिन्न प्रकारचे 32 आवाज काढतो. डॉल्फिन माणसासारखा मोठमोठ्याने हसू शकतो. ओरडुही शकतो: शिकारीचा पाठलाग करताना तो गुरगुरतो आणि शिकार पकडल्याच्या आनंदाच्या भरात तो म्याऊ असा आवाज काढतो. शत्रूला घाबरवण्यासाठी तो उंच स्वरात ओरडतो. डॉल्फिन माशाचे श्रवणेद्रिय फारच तीक्ष्ण असते .आपल्या दूरच्या प्रवासात हे मासे एकमेकांशी एका विशेष प्रकारच्या ध्वनी लहरींनी संपर्क साधतात.
0 Comments