राष्ट्रीय स्मारकांमध्ये प्लास्टिक बंदी
नवी दिल्ली स्वच्छ भारत स्वच्छ स्मारक मोहिमेचा भाग म्हणून देशातील सर्व राष्ट्रीय स्मारके तसेच पर्यटन स्थळांवर प्लास्टिक बंदीची घोषणा करण्यात आली. काल दिल्ली येथे केंद्रीय पर्यटनमंत्र्यांनी महात्मा गांधी जयंतीचा मुहूर्त साधून ही घोषणा केली. सर्व राष्ट्रीय स्मारकांच्या परिसरात संपूर्ण प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी महिनाभरात करण्याचे तसेच या ठिकाणी स्वच्छतागृह व उपहारगृहांची सुविधा पुरवण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
0 Comments