मधुमेह दिनानिमित्त मधुमेह तपासणी शिबिर
मुंबई दिनांक 12 नोव्हेंबर वर्ल्ड डायबेटीस डे अर्थात जागतिक मधुमेह दिनाच्या निमित्ताने गुरुवार दिनांक 14 नोव्हेंबर या दिवशी डायबिटीस असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने धोंडू मामा साठे महाविद्यालयाच्या सभागृहात मधुमेह तपासणी शिबिर होणार आहे.
या शिबिरामध्ये वेगवेगळ्या रक्त तपासण्याबरोबरच रक्तदाब तपासणी नेत्र तपासणी पावलांची तपासणी इत्यादी तपासण्या करण्याची सोयही सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शिबिरात डॉक्टर सुचिता अय्यर, डॉक्टर रमेश गोडबोले ,डॉक्टर जयदेव डोळे, डॉक्टर कल्पना जोग इत्यादी तज्ञ उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. डायबेटिक असोसिएशन तर्फे प्रसिद्ध होणारे मधुमित्र हे मासिक तसेच अन्य प्रकाशनेही सवलतीच्या दरात यावेळी विक्रीसाठी उपलब्ध असतील ,हे शिबिर गुरुवार दिनांक 14 नोव्हेंबर सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले असणार आहे.
0 Comments