१)क्रिकेटच्या देवाचा जळगावच्या विद्यार्थ्यांना मोलाचा संदेश.
आमच्या वार्ताहर कडून
जळगाव 6 ऑक्टोंबर एकाग्रता कष्ट व निष्ठा या तीन गुणांच्या बळावर तुम्ही कोणत्याही क्षेत्रातील यशाचा हिमालय सर करू शकाल असा मोलाचा संदेश विख्यात क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी येथील विद्यार्थ्यांना दिला प्रसंग होता येथील आदर्श विद्या मंदिर च्या वार्षिक क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनाचा या महोत्सवाचे उद्घाटक व प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
आदर्श विद्यामंदिर चा वार्षिक क्रीडा महोत्सव येथील सावरकर क्रीडांगणात सुरू झाला. साक्षात सचिनच समोर असल्याने सगळे खेळाडू मन लावून सर्व कौशल्य पणाला लावून खेळत होते कबड्डी खो-खो लंगडी हे सर्वच खेळ अत्यंत चुरशीचे झाले विशेष म्हणजे विश्वनाथ गेलेल्या आट्यापाट्या या खेळाची ही सामने भरवले गेले होते सचिन यांनी आपल्या भाषणात आट्यापाट्यांचा खास उल्लेख केला सचिन यांच्या उपस्थितीमुळे विद्यार्थ्यांच्या पालकांनीही गर्दी केली होती मैदान तुडुंब भरले होते क्रिकेटच्या देवाचे दर्शन झाल्याने सर्वजण आनंदित झाले होते.
0 Comments