Subscribe Us

भाषिक खेळ-४७

 

उखाणे

उद्देश: उखाण्यांची माहिती होणे व विचारशक्तीस चालना मिळणे.
सूचना :खाली दिलेल्या उखाण्यांची उत्तरे शोधा.प्रत्येक बरोबर उत्तराला एक गुण आणि सोडवायला वेळ एक मिनिट.पाहू कोण सर्वात अगोदर ओळखतील सर्व उखाणे.

५३) महाल असे जाळीदार 
पहाऱ्याला असती,हजार फौजदार 
गुणगुणत फिरती रात्रभर 
महालात झोपताच  डाराडूर 

५४) पाण्यासारखी नितळ,नाही खळखळ ,
नाही आत ,आन्ही बाहेर,सारे दिसे निर्मळ,
घर,दार,गाड्या सगळीकडे वसे 
चेंडू,दगड,वारा यांपासून जपा हिला कसे.

५५) सूपभर लाह्या,त्यात एक 

५६) फिरफिर फिरतो म्हणून याला उलटा टांगला ,
तरी याचा मूळ स्वभाव जाईना,फिरायचा राहीना.

५७) हा पक्षी आहे.त्याच्या नावात त्याचा रंगही 
आहे आणि त्याचा आवाजही.

५८) याला किल्ली आहे लागते पण कुलूप नाही.

उत्तरे-५३) मच्छरदाणी ५४) काच ५५) चंद्र व चांदण्या 
५६) पंखां ५७) कावळा ५८) घड्याळ 





Post a Comment

0 Comments