Subscribe Us

भाषिक खेळ-५५

 


उद्देश : संकेता वरून शब्द शोधता येणे.

सूचना : खाली काही कोडी दिलेली आहेत. यात शब्दांच्या जोड्या मधून योग्य अक्षरे निवडून लपलेला शब्द शोधायचा आहे शेवटच्या ओळीत अर्थाचा संकेत दिलेला आहे. हा खेळ कितीही मुलांना खेळता येईल .

वेळ : कोड्यास दोन मिनिटे


१) शत्रूत नाही पण रिपुत आहे.

 स्वप्नात नाही पण वास्तवात आहे.

 चाफ्यात नाही पण कमळात आहे.

 हे ज्ञानभांडार सदैव खुले आहे.


 २) सुसरीत नाही पण मगरीत आहे.

 गाण्यात नाही पण रागात आहे.

 बऱ्मयाध्ये नाही पण ठीकमध्ये आहे.

 काय तुम्ही मायबोलीला ओळखत नाही ?


 ३) मडक्यात आहे पण सुगडात नाही.

 हारात आहे पण माळात नाही.

 रानात आहे पण शेतात नाही.

 राष्ट्रात आहे पण राज्यात नाही.

 मोठे मी राज्य मला कोण ओळखत नाही !


४)  भातात आहे पण तांदळात नाही.

 रकमेत आहे पण पैशात नाही.

 तबकात आहे पण ताटात नाही.

 त्याचे नागरिका आपण ,नाही माहित ?


 ५) अमृतात नाही पण सुधेतआहे.

 सुगंधात नाही पण सुवासात आहे.

 नाकात नाही पण नासिकेत आहे.

 लेखणीत नाही पण कलमात आहे.

 नाकाला सुखावणारे हे सुख आहे.


उत्तरे-१)पुस्तक २) मराठी ३) महारष्ट्र ४) भारत ५) सुवासिक



Post a Comment

0 Comments