उखाणेउद्देश: उखाण्यांची माहिती होणे व विचारशक्तीस चालना मिळणे.
सूचना :खाली दिलेल्या उखाण्यांची उत्तरे शोधा.प्रत्येक बरोबर उत्तराला एक गुण आणि सोडवायला वेळ एक मिनिट.पाहू कोण सर्वात अगोदर ओळखतील सर्व उखाणे.
६६)निळं निळं तळं करी राजकन्या स्नान
बाहेर येऊन टाके पावलं नाजूक छान
पाऊलखुणांच्या तिच्या सुंदर नक्षी
ज्ञानदानी ती असे सर्वसाक्षी
६७)खजिन्यात एका धनच धन,
लोभावंत त्यावर सार्यांच मन,
धनाची या करता लूट
वाढत राहतं येईना तूट
६८) एक पोर तिला नटवण्याचा घोर
अंग अंग नटवी करून गोंदण
गोंदण्याची नक्षी ज्ञानाचे पक्षी
नटण्याला तिच्या सरस्वती साक्षी
६९) राखाडी साडी डोळे लाल लाल
बाईची या तुरू तुरू चाल,
उंचावर बसून घुम्मत घुम,
चाहूल लागता पळे की धूम !
७०)निळ्या निळ्या वावरात पेरल्या बिया ,
रोज रोज पेरल्या तरी जाती वाया.
उत्तरे-६६) दौत -टाक ६७) ज्ञान ६८) वही ६९) कबुतर ७०) चांदण्या
0 Comments