Subscribe Us

भाषिक खेळ-५०


 उखाणे

उद्देश: उखाण्यांची माहिती होणे व विचारशक्तीस चालना मिळणे.
सूचना :खाली दिलेल्या उखाण्यांची उत्तरे शोधा.प्रत्येक बरोबर उत्तराला एक गुण आणि सोडवायला वेळ एक मिनिट.पाहू कोण सर्वात अगोदर ओळखतील सर्व उखाणे.

७१)लाडावलं पोर फारच द्वाड
वेळेवर येण्याची नाही त्याला चाड
गोलमटोल त्याला लागे दृष्ट
झुरत झुरत होई नष्ट !

७२) डोंगराच्या आत राहे हा मित्र
तेजानं त्याच्या दिपती नेत्र
पाहून त्याला हसती फुले
निद्रेमधुनी उठती मुले

७३)तिरपा डोळा कोट काळा
खाण्यावर याचा नेहमी डोळा

७४)एक हिरवं रान त्यात डुले कमळ लाल
आवाज ऐकाल त्याचा तर दंग होऊन जाल.

७५) निळी निळीई,निळाईची मखमल,
मखमलीवर नक्षी,नक्षीवर बदाम,
बदाम निळे जांभळे,तृप्त झाले डोळे !

उत्तरे-७१) चंद्र ७२)सूर्य ७३) कावळा ७४) पोपट ७५) मोरपीस 

Post a Comment

0 Comments