उखाणेउद्देश: उखाण्यांची माहिती होणे व विचारशक्तीस चालना मिळणे.
सूचना :खाली दिलेल्या उखाण्यांची उत्तरे शोधा.प्रत्येक बरोबर उत्तराला एक गुण आणि सोडवायला वेळ एक मिनिट.पाहू कोण सर्वात अगोदर ओळखतील सर्व उखाणे.
७६)रंगीबेरंगी आणि शेलाटी
मऊसूत कणा,रुबाब देखणा
शिकवी सदा,झिजा कण कण
झिजता दुसऱ्यासाठी यावं मरण
७७)एक बाई उंच तडांग,
डोईवर फूल, चमकता भांग,
भांगात शोभती तेजफुले
देवाच्या दारी हले डुले
स्नेहाचं प्राशन हातोहात,
दिवस असो वा असो रात.
७८)काळी शाल ,काचेचा महाल
रात्रीचा पहारा,अंधारात सहारा
७९)अंधाराची टिकली टिम टिम टिम
उघडते मिटते क्षणोक्षणी
खुश हिच्यावर अंधारराणी
किती करू कौतुक, करू गुणगान,
उत्तर देणार्याचा करू बहुमान
८०)चाकावरून घरात
येऊन बसते दारात
सूत घेते स्नेहाचं
फूल देते प्रकाशाचं
दिवाळीत मला मान
अंगण,दारं करते छान.
मऊसूत कणा,रुबाब देखणा
शिकवी सदा,झिजा कण कण
झिजता दुसऱ्यासाठी यावं मरण
७७)एक बाई उंच तडांग,
डोईवर फूल, चमकता भांग,
भांगात शोभती तेजफुले
देवाच्या दारी हले डुले
स्नेहाचं प्राशन हातोहात,
दिवस असो वा असो रात.
७८)काळी शाल ,काचेचा महाल
रात्रीचा पहारा,अंधारात सहारा
७९)अंधाराची टिकली टिम टिम टिम
उघडते मिटते क्षणोक्षणी
खुश हिच्यावर अंधारराणी
किती करू कौतुक, करू गुणगान,
उत्तर देणार्याचा करू बहुमान
८०)चाकावरून घरात
येऊन बसते दारात
सूत घेते स्नेहाचं
फूल देते प्रकाशाचं
दिवाळीत मला मान
अंगण,दारं करते छान.
उत्तरे-७६)मेणबत्ती ७७) समई ७८) कंदील ७९) काजवा ८०) पणती
0 Comments