उखाणेउद्देश: उखाण्यांची माहिती होणे व विचारशक्तीस चालना मिळणे.
सूचना :खाली दिलेल्या उखाण्यांची उत्तरे शोधा.प्रत्येक बरोबर उत्तराला एक गुण आणि सोडवायला वेळ एक मिनिट.पाहू कोण सर्वात अगोदर ओळखतील सर्व उखाणे.
५९) एवढीशी लहानुबाई ,रस्त्यान गान गाई .
६०) एवढ्श बीळ,त्यात खेळे नागीण ,घर सोडून जात नाही ,
बिलात येईल ते करते फस्त ,चुरूचुरू बोलते मस्त.
६१) कोपराएवधा मिया,त्याची हातभार दाढी.
६२) एवढस घर त्यात बत्तीस बाळे.
६३) डोक्यावर शिंगे पण गाय नव्हे ,
पाठीवर घर पण विंचू नव्हे ,
पोटात पाय पण कासव नव्हे ,लिबलिबीत असते पण कालव नव्हे,मी कोण ?
६४) साऱ्यांवर माया देई छाया
लेशही याचा जाई न वाया
याच्यामुळे निर्मळ हवा
मित्र हा वाटे हवा हवा
६५) शारदेचा सुत हा ज्ञानाचा खजिना
बुद्धीवान्ता हा वाटे दागिना
मित्र हा सदा सर्वदा
साथ ना सोडी येता आपदा
उत्तरे-५९) सायकलची घंटा ६०) जीभ ६१) कणीस ६२) दात
६३) गोगलगाय ६४) झाड ६५) पुस्तक
0 Comments