उखाणेउद्देश: उखाण्यांची माहिती होणे व विचारशक्तीस चालना मिळणे.
सूचना :खाली दिलेल्या उखाण्यांची उत्तरे शोधा.प्रत्येक बरोबर उत्तराला एक गुण आणि सोडवायला वेळ एक मिनिट.पाहू कोण सर्वात अगोदर ओळखतील सर्व उखाणे.
८१)अडगुळं मडगुळं मडगुळ्यात गोटा,
गोट्यावर मात्र जटाच जटा
जटेची शेंडी नेहमीच ताठ,
पोटात पाणी, नाही मी माठ !
८२)पडद्यावर पडदे,पडदे साठ
न्याहारीला पडे हमखास गाठ
हिरविगार शेंडी भरदार मिशा
पाहुणचारासाठी फारच खाशा.
८३)चिमुरडी तर चिमुरडी,
नेसून आली हिरवी साडी,
बघला बघता झाली लाल,
खाण्याचे फारच हाल.
८४)आरगडी बरगडी,गडी तरी किती
चटणी, भाजीशी जोडती नाती
कोणाशीही जमतं मेतकूट
चवीची मग तर नुसती लयलूट
८५)शिडशिडीत पोर कृतीनं थोर
नेसते सदा हिरवा परकर
सजवते,नटवते,आणते रंगत,
कुठल्याही पदार्थाला आवडे तिची संगत.
गोट्यावर मात्र जटाच जटा
जटेची शेंडी नेहमीच ताठ,
पोटात पाणी, नाही मी माठ !
८२)पडद्यावर पडदे,पडदे साठ
न्याहारीला पडे हमखास गाठ
हिरविगार शेंडी भरदार मिशा
पाहुणचारासाठी फारच खाशा.
८३)चिमुरडी तर चिमुरडी,
नेसून आली हिरवी साडी,
बघला बघता झाली लाल,
खाण्याचे फारच हाल.
८४)आरगडी बरगडी,गडी तरी किती
चटणी, भाजीशी जोडती नाती
कोणाशीही जमतं मेतकूट
चवीची मग तर नुसती लयलूट
८५)शिडशिडीत पोर कृतीनं थोर
नेसते सदा हिरवा परकर
सजवते,नटवते,आणते रंगत,
कुठल्याही पदार्थाला आवडे तिची संगत.
उत्तरे-८१)नारळ ८२) कांदा ८३) मिरची ८४) लसूण ८५) कोथिंबीर
0 Comments