उद्देश : संकेता वरून शब्द शोधता येणे.
सूचना : खाली काही कोडी दिलेली आहेत. यात शब्दांच्या जोड्या मधून योग्य अक्षरे निवडून लपलेला शब्द शोधायचा आहे शेवटच्या ओळीत अर्थाचा संकेत दिलेला आहे. हा खेळ कितीही मुलांना खेळता येईल .
वेळ : कोड्यास दोन मिनिटे
१) हितात आहे पण कल्याणात नाही.
माणसात आहे पण मनुष्यात नाही.
लतेत आहे पण वेलीत नाही.
यतीत आहे पण संन्याशात नाही.
असा जगात मी सर्वोच्च गिरी.
२) मळ्यात आहे पण खळ्यात नाही.
तळ्यात आहे पण मळ्यात नाही.
दारात आहे पण घरात नाही.
रस्त्यात आहे पण मार्गात नाही.
निवडणूक आली की मीच राजा,
तर मी कोण ?
३) चाऱ्यात आहे गवतात नाही.
दरवाजात आहे पण दारात नाही.
रथात आहे पण वाहनात नाही.
माझ्यावाचून झोपेचे सुख नाही.
४) पवनात आहे पण वाऱ्यात नाही .
पण मध्ये आहे पण प्रतिज्ञेत नाही.
तीरात आहे पण काठात नाही.
माझ्याशिवाय दिवाळी होतच नाही.
५) रानात नाही पण शेतात आहे.
तागडीत नाही पण तराजुत आहे.
बशीत नाही पण कपात आहे.
रुढीत नाही पण रीतीत आहे.
साऱ्या जगाचा तर हा पोशिंदा आहे.
उत्तरे-१) हिमालय २) मतदार ३) चादर ४) पणती ५) शेतकरी
0 Comments